Odisha Madrasa Crime
esakal
Odisha Madrasa Crime : ओडिशाच्या नयागड जिल्ह्यात १२ वर्षीय मदरशातील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी (Minor Student Killed) धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांनी रविवारी उघड केलं की, काही सहकारी विद्यार्थ्यांनी या मुलावर बलात्कार केला आणि नंतर त्याचा खून करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये फेकला. या प्रकरणी १३ ते १५ वयोगटातील पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांना अंगुल येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.