Video : नडला त्याला तोडला! बकऱ्याशी पंगा घेणं वृद्धाला पडलं महागात

हा व्हिडीओ पाहून तुम्हालादेखील हसू थांबवता येणार नाही.
Video : नडला त्याला तोडला! बकऱ्याशी पंगा घेणं वृद्धाला पडलं महागात
Updated on

सोशल मीडियावर दररोज असंख्य मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे. कदाचित हा व्हिडीओ पाहून तुम्हालादेखील हसू थांबवता येणार नाही. सरळ वाटेने कोणी जात असेल तर उगाच त्याच्या नादाला लागू नये असं कायम म्हटलं जातं. आणि, त्यातूनही जर तुम्ही मुद्दाम कोणाला त्रास दिला तर ती व्यक्ती किंवा प्राणी तुम्हाला सोडत नाही. असाच काहीसा प्रकार एका वृद्ध (old man) व्यक्तीसोबत घडला आहे. उगाचच एका बकऱ्याशी (goat) पंगा घेणं या वृद्धाला महागात पडलं आहे. (old man fight with a male goat funny video goes viral)

श्री. के. शर्मा यांनी ट्विटरवर हा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक वृद्ध व्यक्ती त्याच्या पाळीव बकऱ्याला उगाचच डिवचतांना दिसत आहे. ज्यामुळे रागाच्या भरात हा बकरा थेट वृद्धावर धावून जातो आणि त्याला जमिनीवर पाडतो.

Video : नडला त्याला तोडला! बकऱ्याशी पंगा घेणं वृद्धाला पडलं महागात
सतत गुळण्या करताय? अतिरेकही ठरु शकतो त्रासदायक

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्रथम हे वृद्ध व्यक्ती बकऱ्याला मुद्दाम त्रास देत होते.त्यानंतर त्याच्या गळ्यातील दोरी सोडून त्याच्या शिंगांसोबत खेळत बसले आणि त्याला त्रास देऊ लागले. वृद्धांचा हा प्रकार पाहून हा बकरा चांगलाच चवताळला आणि त्याने थेट वृद्धावर धावत गेला. विशेष म्हणजे केवळ एक -दोन नव्हे तर त्याने ३ ते ४ वेळा या वृद्धाला धक्का मारून खाली पाडलं.

बकऱ्याने मारल्यानंतर हा वृद्ध व्यक्ती त्याच्यासमोर उठून उभा राहतो आणि पुन्हा एकदा मारुन दाखव असं म्हणत त्याला उकसवतो. ज्यामुळे हा बकरा पुन्हा एकदा रागात येतो आणि वृद्धाला धडक देतो.

दरम्यान, अनेकांनी या वृद्धाची तुलना कोरोनाच्या लसीकरणासोबत केली आहे. विशेष म्हणजे शर्मा यांनी कॅप्शनदेखील तसंच दिलं आहे. लस घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा कोरोनासोबत अशीच लढाई करु शकतो, असं ते म्हणाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून २ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज त्याला मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com