
नवी दिल्ली : आपल्या भूमीतून सुरू असलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया रोखण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरला असल्याचा हल्लाबोल लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी ब्रिक्स संसदीय मंचाच्या व्यासपीठावरून केला. तसेच, दहशतवाद्यांविरुद्ध भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत संयत परंतु निर्णायक कारवाई केल्याचेही लोकसभाध्यक्षांनी ठणकावून सांगितले.