
नवी दिल्ली (पीटीआय) : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी आपला मित्रपक्ष काँग्रेसला ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’वरून (ईव्हीएम) सुनावले आहे. याबाबत भाजपच्या सुरात सूर मिसळून अब्दुल्ला म्हणाले, की तुम्ही जिंकलात की ‘ईव्हीएम’वर टीका करत नाहीत आणि पराभूत झाल्यावर ‘ईव्हीम’ला दोष देता. तुम्ही निवडणुकीचे निकाल का स्वीकारू शकत नाहीत?