esakal | तब्बल 8 महिन्यांनंतर आई-वडिलांसोबत जेवलो : उमर अब्दुल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Omar Abdullah

उमर यांनी आणखी एक ट्विट केले आहे, त्यात त्यांनी लिहिलंय की, '२३२ दिवसांनंतर माझी नजरकैद संपली व हरी निवासच्या बाहेर पडतोय. 5 ऑगस्टनंतर सुरू होणारं हे जग वेगळंच आहे.' असं ट्विट करत त्यांनी स्वतःचा फोटो शेअर केला आहे.

तब्बल 8 महिन्यांनंतर आई-वडिलांसोबत जेवलो : उमर अब्दुल्ला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मिरमधून कलम ३७० हटविले गेले आणि त्यापाठोपाठ काश्मिर खोऱ्यात अने मोठ्या घटना घडल्या. अनेक नेत्यांवर कारवाई केली यातील. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनाही अटक करण्यात आली होती. तर मेहबुबा मुफ्ती यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. यापैकी उमर अब्दुल्ला यांची तब्बल आठ महिन्यांनी नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. त्यांनी एक भावनिक ट्विट करत ही माहिती दिली. 

कलम ३७० रद्द करण्याबाबत आणि काश्मिरच्या विभाजनाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यनंतर कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी या अब्दुल्ला व मुफ्ती यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. उमर अब्दुल्ला यांना ८ महिन्यांनी आज मुक्त करण्यात आले, तब्बल २३२ दिवसांनंतर ते आज आपल्या कुटूंबियांना भेटले. उमर यांनी ट्विट केले आहे की, 'तब्बल ८ महिन्यांनंतर आई-वडिलांसोबत जेवलो. नजरकैदेत असताना मी नक्की काय जेवलो हे ही मला आता आठवत नाही.' असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे. उमर यांनी त्यांच्या आई-वडिलांसोबतचा एक फोटोही ट्विट केला आहे.

उमर यांनी आणखी एक ट्विट केले आहे, त्यात त्यांनी लिहिलंय की, '२३२ दिवसांनंतर माझी नजरकैद संपली व हरी निवासच्या बाहेर पडतोय. 5 ऑगस्टनंतर सुरू होणारं हे जग वेगळंच आहे.' असं ट्विट करत त्यांनी स्वतःचा फोटो शेअर केला आहे. 

गेली अनेक वर्ष चर्चेचा, वादाचा विषय ठरलेलं,  जम्मू-काश्मीरला  स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याची, त्यातील काही वादग्रस्त तरतुदी वगळण्याची ऐतिहासिक शिफारस केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले होते. त्यानंतर जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले.