
श्रीनगर : नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारामुळे पडलेल्या घरांची पुन्हा बांधणी करू आणि शक्य तेवढी नागरिकांना मदत केली जाईल, अशी हमी बुधवारी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिली. माझ्या लोकांचे दुःख खूप वैयक्तिक आहे, असे ते म्हणाले.