BF.7 Variant
BF.7 VariantSakal

Coronavirus : 'BF.7'चं सोडा, 'हा' व्हेरिएंट भारतात पसरतोय; लक्षणं जाणून घ्या

China Covid Outbreak : चीनमधल्या कोरोनाच्या बातम्यांनी जगभरात दहशत पसरली आहे. अनेक देशांनी कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. भारत सरकारनेही कठोर पावलं उचलायला सुरुवात केलीय.

परंतु चीनमध्ये कोरोना विषाणूच्या ज्या BF.7 व्हेरिएंटने धुमाकूळ घातलाय तो विषाणू सध्या तरी भारतात प्रभावी ठरत नसल्याचं दिसून येत आहे. त्याऐवजी ऑमिक्रॉनच्या XXB व्हेरिएंटचे रुग्ण समोर आलेले आहेत.

हेही वाचाः क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितलं की, इतर व्हेरिएंटप्रमाणेच याची लक्षणं आहेत. नवीन व्हेरिएंटमध्ये अंगदुखीचं मुख्य लक्षण मानलं जात आहे.

बी.एफ. ७ ची लक्षणं गंभीर नाहीत. परंतु त्याच्या प्रसाराची क्षमता जास्त आहे. या व्हेरिएंटने संक्रमित झालेला व्यक्ती १८ लोकांना बाधित करु शकते. परंतु सध्या तरी हा व्हेरिएंट भारतात पसरलेला नाही.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

मागच्या आठवड्यात चीनमध्ये एका दिवसामध्ये साडेतीन कोटी कोरोना रुग्ण आढळ्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर स्मशानभूमीत मृतदेहांच्या रांगा लागलेला व्हीडिओ व्हायरल झाला होता. परवा चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी 'मिशन मोडवर कोरोनाशी लढावं लागेल' असं म्हणून जीव वाचवण्यासंदर्भात भाष्य केलं होतं.

चीनसह अमेरिका, जपान दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आज मोठा निर्णय घेऊन सहा देशांतून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

''१ जानेवारी २०२३ पासून जीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय. त्यांना प्रवासापूर्वी आपला रिपोर्ट एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल'' असं ट्विट आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com