Omicron : देशातील कोणत्या राज्यात काय निर्बंध? जाणून घ्या

Omicron Corona variant
Omicron Corona variantsakal media

नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे (Corona Variant Omicron) जगात चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये हा व्हेरियंट सापडला असून येथून आलेल्या काही प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. पण, त्यांना ओमिक्रॉनची लागण झालीय का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, कोरोनाला वेळीच अटकाव घालण्यासाठी केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी (Central Government Covid 19 Guidelines) केल्या आहेत. पण, काही राज्यांनी त्यांच्या स्वतंत्र गाइडलाईन्स जारी केल्या असून कोणत्या राज्यात काय निर्बंध आहेत? हे आपण पाहुयात. तुम्ही कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर या गाइडलाइन्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

दिल्ली :

केंद्राने अतिसंवेदनशील यादीमध्ये टाकलेल्या सर्व देशांमधून येणाऱ्या नागरिकांना दिल्ली सरकारने आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, ब्राझील, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्रायल आणि युरोपियन राष्ट्रांचा समावेश आहे.

पाच वर्षांखालील मुलांना कोविड-19 चाचणी करण्याची गरज नाही. ज्यांना कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसतील फक्त त्याच लहान मुलांना आरटी-पीसीआर चाचणीसाठी नमुने द्यावे लागतील. याशिवाय या अतिसंवेदनशील देशांमधून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची चाचणी करून अहवाल येईपर्यंत विमानतळावर वाट पाहावी लागेल. निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना घरी सोडण्यात येईल. पण, त्यांना सात दिवस होम क्वारंटाइन राहावे लागेल. त्यानंतर आठव्या दिवशी आणखी कोरोनाची चाचणी करावी आणि टेस्ट निगेटिव्ह आल्यास कोरोनाची लक्षणे दिसतात की नाही याबाबत प्रवाशांना स्वतःवर लक्ष द्यावे. विमानतळावर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना आठ दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरणात राहून ठरल्याप्रमाणे लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील.

महाराष्ट्र -

महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्या गाइडलाइन्स जारी केल्या असून मुंबईत किंवा राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात येण्याऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना १५ दिवसांपूर्वीच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे. अधिक जोखीम असलेल्या देशांमधून येण्यापूर्वी प्रवाशांनी नियोजन करणे गरजेचे आहे. या प्रवाशांसाठी विमानतळावर चेकींगसाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांना संस्थात्मक विलगणीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यांची दुसरा, चौथा आणि सातव्या दिवशी कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर त्यांना रुग्णालयात पाठवले जाईल. ज्यांची टेस्ट निगेटिव्ह आली त्यांना होमक्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रवाशांची कनेक्टींग फ्लाईट असेल त्यांनी देखील आरटीपीसीआर चाचणी करणं गरजेचं आहे. अशावेळी ज्या प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह येईल त्याच रुग्णांना पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसेच जोखीम नसलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी पॉझिटव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसेच चाचणी निगेटिव्ह आल्यास १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल.

देशाअंतर्गत वाहतुकीसाठी देखील महाराष्ट्र सरकारने नियमावली जारी केली असून प्रवाशांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. तसेच त्यांना ४८ तासांपूर्वीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल.

पश्चिम बंगाल -

पश्चिम बंगाल सरकारने देखील आपल्या कोविड -19 मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहेत. तसेच राज्य सरकारने रात्रीच्या कर्फ्यूची वेळ रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत वाढवली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी दिलेल्या सवलती सुरूच आहेत.

गुजरात -

गुजरात सरकारने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आठ शहरांमध्ये रात्रीचा कर्फ्यू आणखी 10 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गांधीनगर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट, जामनगर, भावनगर आणि जुनागढ या शहरांचा समावेश असून कर्फ्यूची वेळ रात्री 1 ते पहाटे 5 दरम्यान आहे. तसेच दुकाने, पार्लर, सलून, बाजार रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, रेस्टॉरंटमध्ये ७५ टक्के उपस्थित ठेवणे बंधनकारक असणार आहे. अंत्यसंस्कारासाठी जास्तीत १०० लोकांची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ४०० लोकांच्या उपस्थित लग्न पार पाडावे लागेल. आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी, मार्गदर्शक तत्त्वांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत.

कर्नाटक -

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच यासाठी प्रवाशांना ३००० रुपये द्यावे लागतील. ज्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली त्यांना रुग्णालयात पाठवण्यात येणार असून ज्या प्रवाशांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यांची पाचव्या दिवशी कोरोनाची चाचणी करण्यात येईल. यापैकी जे निगेटिव्ह येतील आणि कोरोनाची लक्षणे असतील त्यांना आणखी सातव्या दिवशी चाचणी करावी लागणार आहे.

ओडिशा -

ओडिशा सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी झिरो नाईटसारख्या उत्सवाच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी, केंद्राच्या मार्गदर्शक सूचना ओडिशात लागू असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com