
कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरियंटनं (Omicron variant) सर्वांची चिंता वाढवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमीक्रॉन बाधितांची संख्या पाहिल्यास ती संख्या वाढलेली दिसून येईल. ओमीक्रॉननं (Omicron) जीव गमावलेल्यांची संख्याही गंभीर होताना दिसत आहे. सुरुवातीला फारसं लक्ष न दिल्या गेलेल्या ओमीक्रॉनची भयानकता वाढू लागली आहे. त्याचा परिणाम व्यापक असल्याचे भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
आता देशातील अनेक राज्यांमध्ये ओमीक्रॉनचे पेशंट वाढत चालले आहे. त्यामध्ये केरळ आणि जयपूर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. केरळमध्ये आणखी 9 जण सापडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जयपूरमध्ये देखील ओमीक्रॉनचे चार रुग्ण आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीती वाढू लागली आहे. देशातील ओमीक्रॉन रुग्णांची संख्या 226 झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमीक्रॉ़ननं लक्ष वेधून घेतलं आहे. आज केंद्रीय पातळीवरुन देखील त्याची दखल घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबाबत तातडीनं बैठक घेऊन आता नव्या युद्धासाठी तयार राहण्याचं आवाहन राज्यांना केलं आहे.
आरोग्यमंत्र्यांनी देखील ओमीक्रॉनसाठी त्या त्या राज्यांना वॉर रुम तयार करण्यास सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य खात्यानं ओमीक्रॉनची गांभीर्यानं दखल घेऊन त्याबाबत वेगवेगळ्य़ा प्रकारच्या सुचना आणि नियमावलीही जाहीर केली आहे.