esakal | "...तर एका रुग्णाकडून 406 जणांना होऊ शकतो कोरोना"
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

"...तर एका रुग्णाकडून 406 जणांना होऊ शकतो कोरोना"

sakal_logo
By
नामदेव कुंभार

सोशल डिस्टन्सिगच पालन न केल्यास एक कोरोनाबाधित व्यक्ती 30 दिवसांमध्ये तब्बल 406 जणांना बाधित करु शकते, असं संशोधनाच्या आधारावर केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली. अग्रवाल म्हणाले की, 'सोशल डिस्टन्सिगच्या नियमाचं पालन न केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वेगानं वाढेल. मास्क आणि सोशल डिस्टन्सिग याच्या आधारावर कोरोनाला रोखलं जाऊ शकतं. एका संशोधनातून असं समोर आलेय की, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यास एक व्यक्ती तीस दिवसात 406 जणांना बाधित करु शकतो, त्याचबरोबर शाररिक संपर्क ५० टक्क्यांनी कमी झाला तर तेवढ्याच कालावधीत १५ लोकांना बाधित करु शकतो. तसेच हे प्रमाण 75 टक्क्यांनी कमी झालं तर एक व्यक्ती ३० दिवसांत सुमारे ३ लोकांना बाधित करु शकतो.'

क्लिनिकल मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रीत करायला हवं. त्याबरोबरच कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील, असं अग्रवाल म्हणाले. कोरोना महामारीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. कोरोनापासून वाचण्यासाठी सहा फूट अंतर ठेवायला विसरु नका. मास्कचा वापर व्यवस्थित न केल्यास 90 टक्के कोरोना होण्याची शक्यता बळावते.

हेही वाचा: भयानक! जगाच्या 38 टक्के कोरोना रुग्ण एकट्या भारतात

घरात असतानाही मास्क वापरा -

मास्क लावणं खूप महत्वाचं आहे. लोकांना तुमच्या घरी बोलवू नका. घरात कुटुंबियांसमवेत असतानाही मास्क लावण्याची वेळ आली असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितलं. बरेच लोक कोरोना झाल्यानंतर घाबरुन रुग्णालयात अॅडमिट होण्यासाठी बेड मिळवण्याचा प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घ्यावा, असं आवाहन यावेळी करण्यात आलं.

loading image