esakal | कोव्हिशील्ड लशीचे काय आहेत Side effects?; संशोधनातून सत्य आलं समोर

बोलून बातमी शोधा

Covishield Vaccine
कोव्हिशील्ड लसीचे काय आहेत Side effects?; संशोधनातून सत्य आलं समोर
sakal_logo
By
नामदेव कुंभार

भारतामध्ये एक मे पासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच जागतिक दर्जाच्या लॅन्सेट या शोधपत्रिकेत कोव्हिशील्ड लसीबद्दलचा संशोधन सादर करण्यात आलं आहे. कोव्हिशील्ड लसीचे काही Side effects आहेत का? याबाबतच संशोधन लॅन्सेट यांनी केलं आहे. लॅन्सेट यांच्या संशोधनानानुसार कोव्हिशील्ड लसीचा डोस घेतल्यानंतर प्रत्येक चार पैकी एका व्यक्तीला Side effects होत आहेत. 8 डिसेंबर ते 10 मार्च यादरम्यान लॅन्सेट यांनी लसीच्या Side effects वर संशोधन केलं. यामध्ये 6 लाख 27 हजार 383 लोकांवर संशोधन करण्यात आलं.

लॅन्सेटच्या संशोधनानुसार ऑक्सफोर्ड एस्ट्राजैनेकाची कोव्हिशील्ड असो किंवा फायजर, या दोन्ही लसीच्या Side effects चा सामना लोकांना करावा लागत आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड एस्ट्राजैनेकाची लस बनवत असून त्याला कोव्हिशील्ड असं नाव देण्यात आलं आहे. लॅन्सेट यांनी लसीच्या Side effects बद्दल जाणून घेण्यासाठी लंडन येथील किंग्ज कॉलेजमध्ये संशोधन केलं होतं. यामध्ये असं जाणवलं की, कोव्हिशील्ड किंवा फायजर दोन्हीपैकी कोणतीही लस घेतल्यानंतर थोड्याप्रमाणात Side effects जाणवतात. यामध्ये डोकेदुखी, लस घेतलेल्या ठिकाणी दुखणं, अशक्तपणा यासारखे दुष्परिणाम जाणवतात. हे सर्व Side effects लस घेतल्यानंतर 24 तासांपर्यंत सर्वाधिक जाणवतात. आणि पुढील दोन दिवसांपर्यंत राहतात. काही लोकांना थंडी वाजून येते, जुलाब, ताप, डोकं दुखणं यासारखे Side effects जाणवतात.

संशोधन पथकामधील एका तज्ज्ञांनं सांगितलं की, लस घेतल्यानंतर 50 पेक्षा जास्त वयांच्या लोकांमध्ये Side effects कमी प्रमाणात जाणवतात. ही चांगलं आहे, कारण कोरोनाचा सर्वाधिक धोका यांनाच आहे. 55 वयापेक्षा कमी असणाऱ्या लोकांमध्ये आणि महिलांमध्ये जास्त प्रमाणात Side effects दिसून आले. कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 12 ते 21 दिवसांमध्ये Side effects 39 टक्कें पर्यंत कमी झालाय. याच काळात फायजर लसीमुळे Side effects 58 टक्केंपर्यंत कमी झालेत. 21 दिवसानंतर कोव्हिशील्डच्या Side effects चं प्रमाण 60 टक्के आणि फायजरच्या 69 टक्केंपर्यंत कमी झालं आहे. संशोधकांच्या मते, "कोरोना लसीचे डोस घेतल्यानंतर काही प्रमाणात Side effects जाणवतात, त्यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये."