सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देऊन त्यानी धरले मोदींचे पाय

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

शांतीनिकेतन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिविशेष सुरक्षा यंत्रणेला गुंगार देऊन एका व्यक्तीने थेट व्यासपीठावर जाऊन मोदी यांच्या पायाला स्पर्श केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळेजण अचंबित झाले. शुक्रवारी सकाळी रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व-भारती केंदीय विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्या निमित्ताने मोदी येथे आले होते. या सोहळ्याच्या समाप्तीला काही काळ राहिला असताना ही घटना घडली. स्वपन मारीत असे त्या व्यक्तीचे नाव असून, विश्व-भारीत विद्यापीठापासून 120 किमी अंतरावर असणाऱ्या कृष्णानगर येथून तो आला होता.

शांतीनिकेतन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिविशेष सुरक्षा यंत्रणेला गुंगार देऊन एका व्यक्तीने थेट व्यासपीठावर जाऊन मोदी यांच्या पायाला स्पर्श केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सगळेजण अचंबित झाले. शुक्रवारी सकाळी रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्व-भारती केंदीय विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्या निमित्ताने मोदी येथे आले होते. या सोहळ्याच्या समाप्तीला काही काळ राहिला असताना ही घटना घडली. स्वपन मारीत असे त्या व्यक्तीचे नाव असून, विश्व-भारीत विद्यापीठापासून 120 किमी अंतरावर असणाऱ्या कृष्णानगर येथून तो आला होता. असे करण्यामागे त्याच्या मनात कुठल्याही प्रकाराच वाईट विचार नव्हता.  त्याने मोदींच्या पायाला स्पर्ष करून त्यांना टागोर यांचे छायाचित्र भेट दिले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 
या घटनेमुले मोदीही आश्चर्यचकीत झाले. ही घटना एवढी अचनाक घडली की सुरक्षारक्षकांचाही गोंधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी लगेच्या मोदींना घेराव घातला. व्यासपीठाच्या जवळ असलेल्या कोणालाच ही व्यक्ती कोण आहे याची जराही भनक लागली नाही.   
या कार्यक्रमाला बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल केशरी नाथ त्रीपाठी, विद्यापीठाचे कुलपती साबुजकाली सेन आदी उपस्थित होते.
पोलिसांना मारीत याची बोलपुर पोलिस स्टेशन मध्ये नेऊन त्यांची चौकशी केली. यामध्ये मोदींची भेट आणि रविंद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमे व्यतीरिक्त त्याच्या मनात दुसरे काही नसल्याचे त्याचे म्हणने आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one man breaches PM Modi security cover in Bengal, touches his feet on dais