केरळमध्ये निपाहची साथ वाढली, बाधितांची संख्या ५ वर... मिनी लॉकडाऊन जाहीर

Nipah In Kerala
Nipah In Kerala

Nipah In Kerala: केरळमध्ये आणखी एकाला निपाहची लागण झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्र्यांनी याची माहिती दिली. आतापर्यंत 5 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केरळमधीर आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे.

एका खासगी रूग्णालयातील 24 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे, अशी माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली.

केरळमध्ये प्राणघातक निपाह व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. एका ९ वर्षाचा मुलाला देखील संसर्ग झाला असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. सरकारने मुलावर उपचार करण्यासाठी ICMR कडून मोनोक्लोनल अँटीबॉडी मागवली आहे. निपाह विषाणू संसर्गासाठी हा एकमेव अँटी-व्हायरल उपचार उपलब्ध आहे. मात्र अद्याप वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झालं नाही.

निपाह मानवाकडून माणसात पसरतो आणि मृत्यू दर जास्त आहे.  राज्यात दिसलेला विषाणूचा प्रकार हा बांगलादेशमध्ये आढळला होता.

वीणा जॉर्ज म्हणाल्या, "9 वर्षांचा मुलगा कोझिकोड येथील रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आम्ही ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) कडे मोनोक्लोनल अँटीबॉडीची मागणी केली आहे आणि ते लवकरच कोझिकोडला आणले जाईल."

जिल्हाधिकाऱ्यांना 24 सप्टेंबरपर्यंत कोझिकोडमध्ये मोठ्या प्रमाणात जमणे टाळण्याचे आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याचे वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

Nipah In Kerala
Sakal Podcast: कृषी कायदे परत येणार ते व्हायरल व्हिडीओवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका

निपाह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या 156 आरोग्य कर्मचार्‍यांपैकी कोणीही उच्च-जोखीम श्रेणीतील नाही, कारण त्यांनी मूलभूत संसर्गजन्य रोग नियंत्रण प्रोटोकॉलचे पालन केले होते. तसेच फक्त कोझिकोड नाह तर डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआरच्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की संपूर्ण केरळ राज्याला असे संक्रमण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील  वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.

जॉर्ज म्हणाल्या, ठनिपाहची चाचणी आणि पुष्टी करण्यासाठी राज्यात दोन प्रयोगशाळा आहेत - थोन्नाक्कल येथील प्रगत विषाणूशास्त्र संस्था आणि कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालय - परंतु त्यांच्याकडे निकाल घोषित करण्याची परवानगी नाही. ती परवानगी फक्त एनआयव्ही, पुणेकडे आहे. आम्ही येथील दोन प्रयोगशाळांमध्ये निपाह घोषित करण्याची परवानगी मिळविण्यासाठी पावले उचलत आहोत." (latest marathi news)

"उपचार प्रोटोकॉल प्रथम 2018 मध्ये निपाहच्या उद्रेकादरम्यान जारी केले गेले होते आणि नंतर ते 2021 मध्ये सुधारित केले गेले आणि सध्या देखील त्याचे पालन केले जात आहे. प्रोटोकॉलबद्दल कोणतीही तक्रार नाही. ते वैद्यकीय आणि आरोग्य तज्ञांनी तयार केले आहेत. जर त्यात काही बदल करणे आवश्यक असेल तर ते केले जाईल," असे जार्ज म्हणाल्या.

बाधित आढळलेल्या परिसरात केवळ जीवनावश्यक वस्तू आणि वैद्यकीय साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांनाच काम करण्याची परवानगी असेल. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी लोकांना घाबरू नये आणि त्याऐवजी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. प्रत्येकाने आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि निर्बंधांना पूर्ण सहकार्य करावे, असे ते म्हणाले होते.

Nipah In Kerala
Mumbai Ahmedabad Bullet Train: मोठी बातमी : बहुचर्चित बुलेट ट्रेनच्या कामाला मुंबईत सुरुवात !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com