One Nation One Election : ‘एक निवडणूक’ विधेयक उद्या; संसदीय कार्य मंत्री अर्जुनराम मेघवाल मांडणार
129th Amendment Bill One Nation One Election : केंद्र सरकारतर्फे ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आता १२९व्या घटनादुरुस्ती विधेयक म्हणून ओळखले जाईल. हे विधेयक अर्जुनराम मेघवाल सोमवारी लोकसभेत मांडणार आहेत.
नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयक हे आता ‘१२९ घटनादुरुस्ती विधेयक’ म्हणून ओळखले जाणार अाहे. येत्या सोमवारी (ता. १६) लोकसभेत केंद्र सरकारतर्फे हे विधेयक केंद्रीय न्याय व कायदा व संसदीय कार्य मंत्री अर्जुनराम मेघवाल मांडणार आहेत.