esakal | काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांसोबत चकमक; एक दहशतवादी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

One terrorist killed in Awantipora encounter

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा आज (ता. २६) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांसोबत चकमक झाली आहे. जम्मू काश्मीरमधील त्रालमध्ये ही चकमक झाली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांसोबत चकमक; एक दहशतवादी ठार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा आज (ता. २६) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांसोबत चकमक झाली आहे. जम्मू काश्मीरमधील त्रालमध्ये ही चकमक झाली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवादी लपले असलेल्या भागात घेराव घातला त्यावेळी, दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. त्यानंतर सेनेकडून प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर झालेल्या चकमकीत एक जण ठार झाला आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या यावर्षात १०८वर पोहचली आहे. तर केवळ जून महिन्यात ३७ दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरा क्षेत्रातील चेवा उलर, त्रालमध्ये ही चकमक झाली असून सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वीही गुरुवारी त्रालमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांना एका गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस, 42 आरआर आणि सीआरपीएफ कार्डन यांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली होती. तत्पूर्वी, सकाळी सोपोर जिल्हातील बारामुल्लामध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.