नवी दिल्ली - कांद्याचे दर कोसळल्याप्रकरणी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनाच्या आवारात कांद्याच्या माळा घालून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निदर्शने केली. .बिहारमधील मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी आज संसदेबाहेर आंदोलन केले. त्याचदरम्यान महाविकास आघाडीच्या खासदारांनी कांद्याच्या माळा घालून निदर्शने केली..यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भास्कर भगरे, नीलेश लंके, अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे यांसह काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा समावेश होता.कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हानीबद्दलचे देवळा तालुक्यातील शेतकऱ्याने तयार केलेले प्रतिकात्मक चित्र हातात घेऊन या खासदारांनी ‘कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देत लक्ष वेधून घेतले..यावेळी पत्रकारांशी बोलताना दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे म्हणाले, ‘नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांद्याचे नुकसान झाले आहे. बाजारातील कांद्याचे दर कोसळल्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत.नाफेड, एनसीसीएफ द्वारे होणाऱ्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, त्याची सीबीआयद्वारे चौकशी केली जावी. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही अनुदान मिळावे, केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरणातील धरसोडपणा बंद करावा.’.वाजे म्हणाले, की कांद्याबाबत सरकारचे धोरण धरसोडपणाचे आहे. जागतिक बाजारात आपला माल दरवर्षी जातो, पण सरकार कधीही निर्यात बंद करते. हे धोरण बदलल्याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही, असे वाजे म्हणाले. तर, खासदार नीलेश लंके यांनी कांद्याचे दर सुधारले नाही तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होईल असा इशारा दिला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.