India Corona: ऑनलाईन शॉपिंग करा, संसर्ग टाळा; सरकारने दिल्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online shopping

ऑनलाईन शॉपिंग करा, संसर्ग टाळा; सरकारने दिल्या सूचना

नवी दिल्ली : दिवाळीचा सण तोंडावर आला असताना केंद्र सरकारने कोरोनासाठी आपले मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. यामध्ये नागरीकांना ऑनलाईन शॉपिंग करा आणि कोरोना संसर्ग टाळा असे अवाहन केले आहे.

यामध्ये राज्यांना सूचना देत सरकारने सणउत्सवाचा सीझन जवळ येत असल्याने आणि ईतर काही देशांतील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यांत कोरोनाच्या नियमांचे सक्तीने पालन करून ऑनलाईन शॉपिंगवर भर देऊन प्रवास टाळण्याचे अवाहन केले आहे.

केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या सूचना :

- उत्सवाच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करून अनावश्यक प्रवास टाळा

- या काळात कोरोनाच्या नियमांचे पालन करा

- कंटेनमेंट झोन आणि पाच टक्क्यांपेक्षा अधिक कोरोना संसर्ग असलेल्या जिल्हांत सार्वजनीक कार्यक्रमांस बंदी

- राज्यांनी अगोदरच आपल्या मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात.

- ज्या कार्यक्रमांची परवानगी अगोदरच घेतली आहे, त्यामध्ये मर्यादित लोकांची उपस्थिती असावी आणि कार्यक्रमांवर सरकारचे लक्ष असावे.

- मॉल, बाजार आणि मंदिराच्या ठिकाणी कोरोना नियमांचे सक्तीने पालन केले जावे.

- कोरोना व्यवस्थापनात या पाच गोष्टींचे पालन करा. चाचणी, मागोवा, उपचार, लसीकरण आणि कोविड नियमांचे पालन

- जिल्हा प्रशासनाला कोणत्याही प्रकरणावर कडक नजर ठेवावी लागेल.

पुढील महिन्यांत दिवाळी आणि ईद सारखे सण आले आहेत आणि यादरम्यान इंग्लंड, चीन सारख्या देशात कोरोना परत वाढू लागल्याने शाळाही परत बंद झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारी घेण्याचे अवाहन केले आहे.