आधार कार्ड लवकरच ऑनलाईन

किरण कारंडे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; केंद्रावर जाण्याचा त्रास वाचणार

मुंबई - आधार कार्डसाठी आपल्या परिसरातील केंद्र शोधणे, नंतर रांग लावणे आणि कार्ड येण्याची वाट पाहणे हा त्रास कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मोबाईल किंवा टॅबलेटमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आधार नोंदणी ऑनलाईन करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. तसे झाल्यास हे काम मोबाईलवरून किंवा घरातल्या संगणकावरून करता येईल.

सध्याच्या आधार प्रणालीमध्ये बायोमेट्रिक ठशांसाठी आणि इतर माहितीची नोंद करण्यासाठी केंद्रावरच जावे लागते; पण नव्या तंत्रज्ञानामुळे टॅबलेट, मोबाईलमध्येही "फिंगर स्कॅन‘ची सुविधा आहे. काही कालावधीनंतर हे तंत्रज्ञान सरसकट वापरणे शक्‍य होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे आधार कार्डसाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी ऑनलाईन करणे सहज शक्‍य होईल, असे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी "सकाळ‘ला सांगितले. नागरिकांनी बोटांचे ठसे घेऊन ते आणि इतर कागदपत्रे अपलोड करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळेच लवकरच आधार कार्डची नोंदणी ऑनलाईन केल्यानंतर ते ऑनलाईन मिळू शकेल, असेही गौतम यांनी स्पष्ट केले.

देशातील बहुतांश नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. आता नवजात बालके, शाळकरी मुले यांची नोंदणी करणे, हे आव्हान आहे. म्हणूनच अंगणवाडी आणि रुग्णालयांना टॅबलेट तंत्रज्ञान देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. संपूर्ण राज्यातील 500 रुग्णालये तसेच दोन हजार अंगणवाड्यांमध्ये टॅबलेट देण्यात येणार असल्याचे गौतम यांनी सांगितले. नागपूरमध्ये हॉस्पिटलमध्येच टॅबलेटच्या माध्यमातून नवजात बालकाची आधार नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Online support card soon