नोकऱ्यांची समस्या खूपच बिकट; पुढील तिमाहीत 19 टक्केच नोकऱ्या!

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

भारत चौथ्या क्रमांकावर

येत्या तीन महिन्यात नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या देशांमध्ये जपान पहिल्या, तायवान दुसऱ्या, अमेरिका तिसऱ्या तर भारत चौथ्या क्रमांकावर असलेला देश ठरणार आहे.

नवी दिल्ली : देशात आर्थिक मंदीचे वातावरण असल्याने बेरोजगारीचे प्रमाणही वाढत आहे. तर नवीन नोकऱ्यांच्या संधीचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत देशात फक्त 19 टक्के कंपन्याच नवीन नोकऱ्या देऊ शकणार आहेत. याबाबतची माहिती एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आली आहे.

'मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलुक' या जागतिक स्तरावरील संस्थेकडून याबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल आज (मंगळवार) जाहीर करण्यात आला. या सर्वेक्षणासाठी 5131 कंपन्यांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यामध्ये फक्त 19 टक्के कंपन्यांनी नोकरभरतीची शक्यता व्यक्त करण्यात आली. तर 52 टक्के कंपन्यांनी कोणत्याही नोकरभरतीची शक्यता नाही, असे स्पष्ट केले.

भारत चौथ्या क्रमांकावर

येत्या तीन महिन्यात नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या देशांमध्ये जपान पहिल्या, तायवान दुसऱ्या, अमेरिका तिसऱ्या तर भारत चौथ्या क्रमांकावर असलेला देश ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 19 Percent Employers in India Bullish on Hiring in October December Quarter says Survey