esakal | कोरोनापासून आता आपल्याला देवच वाचवू शकेल; आरोग्यमंत्र्यांच धक्कादायक वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus_1_4.jpg

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यात कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे

कोरोनापासून आता आपल्याला देवच वाचवू शकेल; आरोग्यमंत्र्यांच धक्कादायक वक्तव्य

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

बंगळुरु- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यात कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे. आता आपल्या राज्याला केवळ देवच वाचवू शकतो असं ते म्हणाले आहेत. राज्यात वाढत असणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या यावरुन त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता.

‘रिलायन्स’ने ‘५ जी’ तंत्रज्ञानासह केल्या महत्वाच्या घोषणा; वाचा सविस्तर
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसने केली होती. यावर उत्तर देताना आरोग्य मंत्री बी. श्रीरामलू यांनी कोरोना महामारीतून राज्याला आता देवच वाचवू शकेल असं म्हटलं होतं. मात्र, श्रीरामलू यांनी नंतर यावर स्पष्टीकरण दिलं असून त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही, तोपर्यंत देवच आपलं रक्षण करेल असं मी म्हणालो असल्याचं श्रीरामलू म्हणाले आहेत.

मला सांगा कोरोना विषाणूचा प्रचार रोखणे कुणाच्या हातात आहे. फक्त देवच आपणा सर्वांना यातून वाचवू शकतो. लोकांमधील जागरुकता यासाठी महत्वाची आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस राजकारणाच्या खालच्या पातळीला उतरली आहे. असं करणं कुणालाही शोभत नाही, असं श्रीरामलू बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

कर्नाटक काँग्रेस प्रदेश प्रमुख डी.के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजप सरकारवर टीका केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच राज्यातील कोरोनाबाधित दिवसेंदिवस वाढत आहेत, असं ते म्हणाले होते. यावेळी काँग्रेसने विशेष करुन श्रीरामलू आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांना लक्ष केलं होतं.

भारतीय 'कोवॅक्सिन'चे मानवी परिक्षण सुरु; नाकाद्वारे दिली जाणार लस
कोरोना विषाणू जगभर पसरत आहे. पुढील दोन महिने आपल्या सगळ्यांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. यात राजकारण आणणे बरोबर नाही. आम्ही निष्काळजीपणा दाखवत आहोत असा विरोधकांचा आरोप साफ खोटा आहे, असंही श्रीरामलू म्हणाले आहेत. 

दरम्यान, कर्नाटकमध्ये आतापर्यंत 47,253 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. बुधवारी राज्यात सर्वाधिक 3,174 रुग्ण आढळले. कोरोना विषाणूने आतापर्यंत 928 रुग्णांचा जीव घेतला आहे. शिवाय आतापर्यंत 18,466 लोकांना घरी सोडण्यात आलं आहे.
 

loading image
go to top