

Smart Classrooms and Digital Learning Revive Government Schools in Uttar Pradesh
esakal
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील बरैनी प्राथमिक विद्यालय आणि कनकसराय संयुक्त विद्यालयाने आपल्या बदललेल्या रूपामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकेकाळी जीर्ण अवस्थेत असलेल्या या सरकारी शाळा आज आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण आणि दर्जेदार अध्यापनामुळे परिसरातील अनेक खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही स्पर्धा देत आहेत.