Army Chief : चुका सुधारून प्रत्युत्तर, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत सरसेनाध्यक्षांची स्पष्टोक्ती; लष्करी कारवाईत विमाने पडल्याची अप्रत्यक्ष कबुली
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतालाही लढाऊ विमाने गमवावी लागली होती, याची अप्रत्यक्ष कबुली सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमधील वक्तव्यात दिली.
Army Chief Admits to Loss of Indian Aircraft During StrikeSakal
सिंगापूर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्याविरोधात मोठी लष्करी कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान भारतालाही काही लढाऊ विमाने गमवावी लागल्याची चर्चा होती. सरसेनाध्यक्ष अनिल चौहान यांनी आज त्याबाबत अप्रत्यक्ष कबुलीच दिली.