नवी दिल्ली : पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सुरू असलेली लष्करी कारवाई थांबविली होती. भारत -पाकिस्तान दरम्यान अमेरिकेची मध्यस्थी किंवा व्यापार करार यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. .भारताने कोणाचीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही आणि स्वीकारणारही नाही, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान भारताची भूमिका मांडली. भारत आता दहशतवादाला छुपे युद्ध नव्हे तर थेट युद्धच मानतो आणि याविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच आहे, असेही ते ठामपणे म्हणाले. .पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘जी-७ परिषदे’मध्ये भेट होऊ शकली नव्हती. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची आज दूरध्वनीवरून अर्ध्या तासाहून अधिक वेळ सविस्तर चर्चा केली. उभय नेत्यांच्या या संवादाबद्दलची सविस्तर माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना मेजवानीसाठी दिलेले निमंत्रण आणि यावरून विरोधकांकडून सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. .पहलगाममध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबविताना पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट केले. यात पाकिस्तानी लष्कर आणि हवाई दलाचे अकराही तळही उद्ध्वस्त केले होते. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत व पाकिस्तानदरम्यान संघर्ष विराम होत असल्याची घोषणा केली होती. तसेच वेगवेगळ्या व्यासपीठांवरून ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संघर्ष थांबविण्यासाठी आपण मध्यस्थी केल्याचे तेराहून अधिक वेळा जाहीरपणे सांगितले आहे..म्हणून भेट झालीच नाहीपरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की दोन्ही नेत्यांची भेट कॅनडामध्ये ‘जी-७’ परिषदेदरम्यान ठरली होती. परंतु ट्रम्प यांना अचानक अमेरिकेत परतावे लागल्याने ही भेट होऊ शकली नाही. त्यानंतर ट्रम्प यांच्या विनंतीवरून आज दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर संवाद झाला. ही चर्चा सुमारे ३५ मिनिटे चालली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून शोकसंवेदना व्यक्त केली होती आणि दहशतवादाविरोधातील लढ्याला पाठिंबा दर्शविला होता. त्या घटनेनंतर दोन्ही नेत्यांचा हा पहिलाच संवाद असल्याने पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी बोलताना ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर चर्चा केली..अचूक अन् भेदक कारवाईपरराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारताने २२ एप्रिलनंतर दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याचा आपला दृढ निश्चय संपूर्ण जगाला दाखवून दिला होता. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, ६-७ मेच्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. भारताची ही कारवाई अत्यंत मोजकी, अचूक आणि संघर्ष न वाढवणारी होती. तसेच, भारताने हेही स्पष्ट केले होते की पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला तोफगोळ्यांनी प्रत्युत्तर दिले जाईल..दहशतवाद आता थेट युद्धचअध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सविस्तर माहितीचे गांभीर्याने आकलन केले आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. यात पंतप्रधान मोदींनी हेही स्पष्ट केले की, भारत आता दहशतवादाला छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) न मानता थेट युद्धच मानतो आणि भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरूच आहे, असेही विक्रम मिस्री यांनी सांगितले. अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना विचारले की, ते कॅनडाहून परतताना अमेरिकेत थांबू शकतात का. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पंतप्रधान मोदींनी असमर्थता दर्शवली. दोघांनी लवकरच प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले..इराण- इस्राईल संघर्षावरही चर्चाअध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींनी इस्राईल-इराण संघर्षावरही चर्चा केली. त्याचप्रमाणे रशिया-युक्रेन युद्ध, आशिया- प्रशांत क्षेत्रासंदर्भात दोन्ही नेत्यांनी चर्चा केली तसेच या क्षेत्रातील ‘क्वाड’ समूहाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘क्वाड’च्या पुढील बैठकीसाठी पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष ट्रम्प यांना भारत दौऱ्याचे आमंत्रण दिले आहे. ट्रम्प यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचे सांगितले..Crop Loan : दोन महिन्यांत केवळ ६८ टक्के वाटप; पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांचा आखडता हात.मोदी म्हणालेदहशतवादाविरोधातील निश्चय जगास दाखविलाभारताची लष्करी कारवाई अचूक आणि नेमकीपाकच्या गोळीबारास तोफगोळ्यांनीच उत्तर देऊविद्यमान व्यवस्थेअंतर्गतच भारत-पाकमध्ये चर्चाराजकीय आघाडीवर भारतामध्ये मतैक्य.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.