
नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान झालेल्या सैन्य संघर्षात अण्वस्त्रांच्या वापराचा कोणताही उल्लेख वा संकेत पाकिस्तानकडून नव्हता, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीसमोर सांगितले. त्याचप्रमाणे, लष्करी कारवाईबद्दल पाकिस्तानला इशारा दिल्याबाबतचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे वक्तव्य कारवाईच्या आधी नव्हे तर कारवाई झाल्यानंतरचे होते, असेही परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले. अण्विक संघर्षांची शक्यता असल्यानेच मध्यस्थी घडविल्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिवांनी भूमिका स्पष्टपणे मांडली.