
पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली. दिल्लीच्या पालम विमानतळावरून त्यांनी सकाळी ७ वाजता उड्डाण केले आणि थेट जालंधरजवळील या महत्त्वाच्या एअरबेसवर पोहोचले. येथे त्यांनी तब्बल एक तास घालवला आणि जवानांशी संवाद साधला.