
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता तिथे शांतता आहे, पण ओडिशातील संबलपुरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर ब्लॉकमधील टेंगनामाल गावातील सशस्त्र सीमा बलातील (SSB) जवान देबराज गंड यांच्या पत्नी लिपी गंड यांचे आज, 13 मे रोजी उपचारादरम्यान निधन झाले. अवघ्या 15 दिवसांच्या नवजात मुलीला मातृछत्र हरपले आहे, तर देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या देबराज यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.