नवी दिल्ली - भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी पराग जैन यांची गुप्तहेर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ चे (रॉ) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..सद्यःस्थितीत ‘एव्हिएशन रिसर्च सेंटर’चे (एआरसी) प्रमुख असलेले जैन यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी हवाईदल आणि लष्करी तळांची त्याचप्रमाणे दहशतवादी संघटनांच्या तळांची अचूक माहिती मिळविण्यात जैन यांचा मोठा वाटा होता..पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ‘रॉ’ प्रमुखपदी जैन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. भारतीय पोलिस सेवेच्या १९८९ च्या तुकडीचे पंजाब केडरचे अधिकारी असलेले जैन एक जुलैला पदाची सूत्रे स्वीकारतील. मावळते ‘रॉ’ प्रमुख रवी सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपत आहे..‘रॉ’चे प्रमुख म्हणून जैन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. ‘एव्हिएशन रिसर्च सेंटर’चे प्रमुख होण्याआधी पराग जैन यांनी चंडीगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक, लुधियानाचे पोलिस उपमहानिरीक्षक यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या..कॅनडा, श्रीलंका यासारख्या देशांमध्ये भारतीय वकिलातींमधील महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली होती. जम्मू-काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणे, ऑपरेशन बालाकोट यासारख्या मोहिमांमध्येही गोपनीय माहितीचे संकलन आणि विश्लेषणात त्यांची निर्णायक भूमिका राहिली होती..मालदीव आणि बांगलादेशमध्ये निर्माण झालेले राजकीय संकट आणि भारतविरोधी मोहिमांमुळे दक्षिण आशियात भारतीय प्रभावाला बसलेला धक्का यामुळे ‘रॉ’च्या कार्यपद्धतीवर टीका झाली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जैन यांच्या हाती ‘रॉ’च्या प्रमुखपदाची धुरा येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.