
जम्मू : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानने केलेले ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले भारताने निष्प्रभ केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर शत्रूच्या प्रदेशाजवळ असलेल्या शून्य रेषेजवळ असलेल्या चौकीचे नेतृत्व करणाऱ्या सहायक कमांडंट नेहा भांडारी यांच्या तुकडीने पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.