
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयकावर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर होताच आज संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष तसेच डाव्या पक्षांसह अन्य पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घालत या अहवालाचा विरोध केला.