esakal | ‘यूपी’त विरोधी नेत्यांची धरपकड
sakal

बोलून बातमी शोधा

DESH

‘यूपी’त विरोधी नेत्यांची धरपकड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकरी आंदोलकांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज धरपकड करण्यात आली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांना पोलिसांनी रोखून धरले.

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी आज पहाटेच सितापूर येथे ताब्यात घेतले. त्या आज सकाळीच काँग्रेस नेते दिपेंदर हुडा यांच्यासोबत लखीमपूर सीमेवर पोचल्या होत्या पण पोलिसांनी त्यांना अडवले यावेळी त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमकही झाली.

पोलिसांनी ताब्यात घेताच प्रियांका यांनी उपोषणाला सुरूवात केल्याचे प्रदेश काँग्रेसकडून सांगण्यात आले. पक्षाकडून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात प्रियांका गांधी यांना ज्या खोलीत ठेवण्यात आले तिथे त्या झाडूच्या माध्यमातून साफसफाई करत असल्याचे दाखविले आहे. पोलिसांच्या या कारवाईचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी निषेध केला आहे. याआधी लखनौमध्येही पोलिसांनी प्रियांका यांचा ताफा रोखून धरला होता.

अखिलेश यांनाही रोखले

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही आज मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही पोलिसांनी रोखून धरले. या कारवाईनंतर त्यांनी लखनौमधील विक्रमादित्य मार्गावरील निवासस्थानासमोरच आंदोलन सुरू केले. या वेळी यादव म्हणाले की, लोकांचा आवाज वाहनांखाली चिरडला जात असून ज्यांच्यामुळे हा हिंसाचार झाला तो मंत्री आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात यावी.

मंत्र्याच्या मुलाला अटक करा ; टिकैत

लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते (बीकेयू) राकेश टिकैत यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी केली तसेच त्यांच्या मुलालाही अटक करण्यात यावी असे म्हटले आहे. या हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई दिली जावी अशी मागणी त्यांनी केली होती.

loading image
go to top