Opposition Meeting Update : विरोधकांच्या आघाडीचं नाव ठरलं! आता युपीए नव्हे तर 'INDIA'?

Opposition Meeting Update
Opposition Meeting Update
Updated on

बंगळुरू - बंगळुरू येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधाकांची आघाडी तयार कऱण्यात आली आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले असून या आघाडीचं नाव निश्चित कऱण्यात आलं आहे. नावाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

Opposition Meeting Update
Kirit Somaiya : 'मला पेनड्राइव्ह दिलाय, आता तो बघणं म्हणजे…'; नीलम गोऱ्हेंनी सभागृहात मांडला महत्वाचा मुद्दा

बंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचं आयोजन कऱण्यात आले होते. याच बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात I- Indian, N - National, D-Democractic, I- Inclusive, A- Alliance असं हे नाव आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

या नावाचा अर्थ भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी असा असू शकतो. मात्र याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. या बैठकीत २६ विरोधीपक्ष उपस्थित होते. याच बैठकीत आगामी काळातील नियोजन निश्चित करण्यात आलं आहे.

याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छूक नसल्याचं म्हटलं आहे. बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. काँग्रेसने पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.