युपीमध्ये निवडणुका जाहीर होताच आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Pradesh Assembly Election

युपीमध्ये निवडणुका जाहीर होताच आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना सुरुवात

लखनऊ : निवडणूक आयोगाने शनिवारी उत्तर प्रदेशात सात टप्प्यात विधानसभा निवडणुका जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रचंड बहुमतासह सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे, तर समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी 10 मार्च रोजी भाजपचा सफाया होणार असल्याचे म्हटले आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेचे स्वागत करताना, आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या हेराफेरीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: राज्यात हॉटेल, चित्रपटगृहांवर निर्बंध; जाणून घ्या काय सुरू काय बंद

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले की, लोकशाहीच्या महानपर्वात राज्य निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेचे स्वागत आहे. डबल इंजिन सरकारच्या कामगिरीच्या आधारे जनता जनार्दनच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल असे असा दावा योगी यांनी केला आहे. तर, सपाने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यामुळे 10 मार्चला भाजपचा पराभव अटळ आहे. निवडणूक आयोगाने घातलेल्या अटींचे पालन केले जाईल असेही अखिलेश यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: राज्य सरकारची नवी नियमावली; नाईट कर्फ्यूची घोषणा

मायावती म्हणाल्या की, बसपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार आदींनाही पक्षशिस्तीसह आजपासून लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, राज्यात भाजपने 312 जागा जिंकल्या होत्या आणि त्यांच्या मित्रपक्षांना 13, तर सपाला 47, बहुजन समाज पक्षाला 19 आणि काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या. भाजपचा मित्रपक्ष अपना दल (S) ने नऊ जागा जिंकल्या आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने (SubhSP) चार जागा जिंकल्या होत्या. तर, राष्ट्रीय लोक दल आणि निषाद पक्षानेही प्रत्येकी एका जागेवर खाते उघडले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top