कोणते पाय कोणाचे? नेटिझन्सचंही डोकं चालेना...

वृत्तसंस्था
Monday, 7 October 2019

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता समुद्र किनाऱयावर एकमेकांना मिठी मारणाऱया जोडप्याचे छायाचित्र व्हायरल होऊ लागले आहे.

नवी दिल्लीः सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता समुद्र किनाऱयावर एकमेकांना मिठी मारणाऱया जोडप्याचे छायाचित्र व्हायरल होऊ लागले आहे.

2016 मध्ये हे छायाचित्र आहे. मात्र, सोशल मीडियावर पुन्हा या छायाचित्राने डोके वर काढले असून, कोणते पाय कोणाचे? यावरून चर्चा रंगू लागली आहे. काहींनी फोटोशॉपची कमाल असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण, या छायाचित्राने अनेकांना विचार करायला भाग पाडले आहे. छायाचित्र Reddit वर शेअर करण्यात आले आहे. ज्या यूजरने हे छायाचित्र शेअर केले आहे, त्याने या छायाचित्रात जे दिसतंय ते तसं का दिसतं?, याबाबत मदत मागितली आहे.

छायाचित्रामधील जोडप्याचे पाय पाहून लोक हैराण झालेत. प्रत्येकजण वेगवेगळे कारण देत आहे. एका नेटिझन्सनी उत्तर देताना म्हटले आहे की, 'छायाचित्रातील मुलाने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा शॉर्ट घातला आहे. तर मुलीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. याने इल्युजन झाले आहे. शॉर्ट्सचा काळा रंग पांढऱ्या रंगापेक्षा अधिक उठून दिसतो आहे. मुलाच्या शॉर्ट्समुळेच छायाचित्रात असे दिसत आहे. मुलीचा ड्रेस पूर्णपणे दिसतच नाही.' अनेकांना हे उत्तर आवडले आहे तर काहींनी हे वेगळेच काही तरी असल्याचे म्हटले आहे...

This hurts my brain...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This optical illusion of a couple hugging is confusing the internet