Jharkhand Crime : ऑर्केस्ट्रा कलाकारावर झारखंडमध्ये बलात्कार

झारखंडमध्ये गुन्हेगारी वाढत असून दुमका येथे स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलेली असताना पलामू येथे छत्तीसगड येथून आलेल्या एका महिला ऑर्केस्ट्रा कलाकारावर बलात्कार झाल्याची घटना घडली.
orchestra artist gang-raped in Jharkhands 2 arrested crime
orchestra artist gang-raped in Jharkhands 2 arrested crimeSakal

पलामू : झारखंडमध्ये गुन्हेगारी वाढत असून दुमका येथे स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलेली असताना पलामू येथे छत्तीसगड येथून आलेल्या एका महिला ऑर्केस्ट्रा कलाकारावर बलात्कार झाल्याची घटना घडली. गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी दोघांना अटक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ देऊन गाडीतील लोकांनी महिला कलाकारावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने लेखी तक्रार दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. पीडित कलाकार छत्तीसगडची रहिवासी असून ती एका ऑर्केस्ट्रा समूहात काम करत असे.

ती कार्यक्रमासाठी हुसेनाबाद येथे पोचली होती. तेथून परतताना चार आरोपींनी तिला अमली पदार्थ खाऊ घातले आणि बलात्कार केला. त्यानंतर तिला रस्त्यावरच सोडून दिले. स्थानिक नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com