
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आगामी पुस्तकाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. उद्या (17 मे) प्रकाशित होणाऱ्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित स्फोटक दावे केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 100 दिवस आर्थर रोड कारागृहात असताना राऊत यांनी हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातील ‘राजा का संदेश साफ है’ हे प्रकरण विशेष चर्चेत आहे, ज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी गुजरात दंगल प्रकरणात मोदी आणि शाह यांना कशी मदत केली, याची रंजक कहाणी आहे.