esakal | लसीकरणासाठी 24 तासांत एक कोटी लोकांनी केली नोंदणी

बोलून बातमी शोधा

लसीकरण

लसीकरणासाठी 24 तासांत एक कोटी लोकांनी केली नोंदणी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

भारतामध्ये एक मे 2021 पासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. CoWIN आणि Aarogya Setu अॅपवर लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करावी लागते. बुधवारी नोंदणीला सुरुवात झाली. अवघ्या एका दिवसात तब्बल एक कोटी लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. बुधवारी सकाळपासून भारतीयांनी अॅपवर नोंदणीसाठी घाई केली. काही वेळासाठी CoWIN अॅप क्रॅशही झालं होतं. असं असतानाही 24 तासांत एक कोटींपेक्षा लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

MyGovIndia द्वारा ट्विटवर माहिती देण्यात आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत दिवसभरात एक कोटींपेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली आहे. Cowin आणि Aarogya Setu अॅपशिवाय Cowin पोर्टलवरुनही नोंदणी करता येते. पण पोर्टलवरही नोंदणीसाठी समस्या पाहायला मिळाल्या. लोकांनी सोशल मीडियावर याबाबात आपली नाराजी व्यक्त केली. Cowinregistration सोबत Cowindown या हॅशटॅगसह लोकांनी आपल्या समस्या मांडल्या. Cowin च्या संकेतस्थळ अॅक्सेस मिळालं तरीही लोकांना रजिस्ट्रेशनमध्ये अडचणी येत होत्या. बुधवारी दिवसभरात एक कोटींपेक्षा जास्त जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

CoWIN App ची प्रक्रिया नेमकी कशी असेल?

CoWIN App लॉन्च झाल्यानंतर नाव नोंदणीसाठी तीन पर्याय उपलब्ध असतील. यात स्वत: नाव नोंदणी करणं, अधिकाऱ्यांकडे जाऊन नाव नोंदवणे आणि किंवा अधिकाऱ्याच्या मदतीने नागरिकांना नोंदणी करता येईल. या एपचे चार वेगवेगळे मॉड्यूल असतील. यूजर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर मॉड्यूल, लाभार्थी नोंदणी, व्हॅक्सीननेशन आणि लाभार्थी नोंदणी मान्यता आणि लसीकरण स्टेटस याचा समावेश असेल.

आधार कार्डच्या माध्यमातून नोंदणी

कोविन अ‍ॅप (CoWIN App) वर नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड (Aadhar Card) अनिवार्य असेल. लस देण्यापूर्वी 12 भाषेत नागरिकांना मेसेजच्या माध्यमातून सूचित करण्यात येईल. लसीकरण मोहिमेत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांनाही याची माहिती मिळणार आहे. लसीकरणाचे दोन डोस घेणाऱ्यांना क्यूआर कोडच्या आधारावर प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.