Air India : आठवडाभरात ८० उड्डाणे रद्द; गुजरात विमान दुर्घटनेनंतरची स्थिती, हवाई प्रवासाला विलंब
Flight Cancellations : गुजरातमधील विमान दुर्घटनानंतर एअर इंडियाने खबरदारी घेत अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. यासोबतच खराब हवामानामुळे काही आंतरराष्ट्रीय विमाने इतर विमानतळांवर वळवावी लागली आहेत.
वाराणसी/नवी दिल्ली : गुजरातमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर विमान कंपनीकडून अधिक खबरदारी घेतली जात असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने आठवडाभरात ८० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.