Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Owaisi Slams Elon Musk Over PM Modi Remark: ओवैसी यांनी भारतीय जनता पक्षाच्या मौनावरही कडाडून टीका केली... ''राष्ट्रवादाचा गवगवा करणारा भाजप एका परदेशी अब्जाधीशाने देशाच्या निर्णयांना आव्हान दिल्यावर शांत का आहे?''
asaduddin owaisi

asaduddin owaisi

esakal

Updated on: 

AIMIM vs BJP: टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क यांनी भारतातील व्यावसायिक व राजकीय निर्णयांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचे कट्टर विरोधक असलो, तरी कोणत्याही परदेशी नागरिकाला भारताच्या अंतर्गत निर्णयांवर आणि देशाच्या पंतप्रधानांवर बोट ठेवू देणार नाही, असा सज्जड इशारा ओवैसी यांनी दिलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com