esakal | 'एक दिवस ओवेसीही म्हणतील हनुमान चालिसा'
sakal

बोलून बातमी शोधा

Owaisi will soon chant Hanuman Chalisa, says Yogi Adityanath

दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे, तसे अरविंद केजरीवाल हनुमान चालिसा गाताना दिसत आहेत. एक दिवस असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालिसा म्हणताना दिसतील, अशा शेलक्‍या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी आज टीकास्त्र सोडले.

'एक दिवस ओवेसीही म्हणतील हनुमान चालिसा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे, तसे अरविंद केजरीवाल हनुमान चालिसा गाताना दिसत आहेत. एक दिवस असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालिसा म्हणताना दिसतील, अशा शेलक्‍या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी आज टीकास्त्र सोडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मतदानाची तारीख जवळ येत असल्याने प्रचार सभांचा जोर वाढतो आहे. भाजपचे नेते केजरीवाल यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकास्त्र सोडले. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

मराठीमध्ये बातम्या ऐकण्यासाठी इथे क्लिक करा

केजरीवाल यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीदरम्यान आपण हनुमानभक्त असल्याचे सांगितले होते, तसेच हनुमान चालिसेतील काही भाग म्हणूनही दाखविला. त्यावर आदित्यनाथ यांनी टीका केली आहे. ""केजरवाल आता हनुमान चालिसा म्हणत आहेत. ओवेसीही लवकरच म्हणतील. आपल्या एकतेचा हा विजय आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी असेच एकत्र राहिले पाहिजे. आपल्या एकतेमुळे 20 टक्‍क्‍यांच्या व्होट बॅंकेचे राजकारण जमिनीत गाडले जाईल,'' असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.