राजश्री प्रॉडक्शनचे राजकुमार बडजात्या यांचे निधन

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि राजश्री प्रॉडक्शन्सचे प्रमुख राजकुमार बडजात्या यांचे आज (ता. 21) आज सकाळी निधन झाले. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास सोडला. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांच्या निधनानंतर राजश्री प्रॉडक्शन हाऊसने ट्विटद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरन आदर्श यांनीही ट्विट करत राजकुमार बडजात्या यांना श्रद्धांजली वाहिली. 'राजकुमार यांट्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृदूभाषी स्वभावामुळे कलाविश्वात ते राजबाबू म्हणून ओळखले जायचे. मी बडजात्या कुटूंबच्या दुःखात सहभागी आहे.' असे ट्विट तरन आदर्श यांनी केले आहे.

राजकुमार यांच्या राजश्री प्रॉडक्शन हाऊसने अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली. हम आप के है कौन, हम साथ साथ है, विवाह, नदीयाँ के पार हे त्यापैकी काही प्रसिद्ध चित्रपट. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा बडजात्या, मुलगा सूरज बडजात्या, मुलगी कविता असा परिवार आहे.

Web Title: owner of Rajashri Production Rajkumar Barjatya passed away