'मोदी सरकारची अकार्यक्षमताच जीडीपीच्या घसरणीला जबाबदार'

'मोदी सरकारची अकार्यक्षमताच जीडीपीच्या घसरणीला जबाबदार'

नवी दिल्ली: कोरोना महासंकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर (Indian Economy) परिणाम पडल्याचं चित्र आहे. कोरोना संकटाच्या आधीच भारतीय अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. कोरोना संकटाने यामध्ये आणखीनच भर घातल्याचं चित्र आहे. भारताच्या जीडीपीमध्ये २०२०-२१ आर्थिक वर्षात -7.3% ने घसरण झाली आहे. गेल्या चार दशकांतील ही सर्वात वाईट स्थिती आहे. २०१९-२० आर्थिक वर्षात जीडीपी (GDP) वाढ ४ टक्के होती. केंद्र सरकारने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरोना महामारीमुळे जीडीपीमध्ये घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी लावला होता आणि त्यानुसारच घडताना दिसतंय. मात्र आता यावर काँग्रेस पक्षाने जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते पी चिदंबरम (P Chidambaram, Congress) यांनी जीडीपीत घसरण झाल्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (The current state of the economy is compounded by the ineptitude and incompetent economic management of the BJP led NDA government P Chidambaram Congress)

त्यांनी म्हटलंय की, 2020-21 मधील जीडीपी हा 2018-19 वर्षातील जीडीपीहून कमी आहे. 2020-21 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेच्या गेल्या चार दशकांच्या इतिहासातील सर्वांत अंधकारमय वर्ष राहिलं राहिलं आहे. 2020-21 च्या चार तिमाहीमधून याचा प्रत्यय आपल्याला येतो. कोरोनाच्या महासंकटाच्या परिणामांमुळे अर्थव्यवस्थेची ही सद्यस्थिती नक्कीच आहे. परंतु भाजपाप्रणित एनडीए सरकारच्या अक्षम्यता आणि अकार्यक्षम आर्थिक व्यवस्थापनामुळे ही परिस्थिती आणखी विदारक बनली आहे.

गेल्या चार दशकातील भारतीय अर्थव्यवस्थेची ही सर्वात वाईट कामगिरी आहे. अर्थव्यवस्थेची नकारात्मक वाढ झाली आहे. याशिवाय वित्तीय वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 1.6 टक्क्यांची अल्प वाढ झाली आहे. एनएसओने सोमवारी जीडीपी Gross Domestic Product (GDP) जाहीर केला. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लादण्यात आला. त्यानंतर जूलै महिन्यापासून अनलॉकला सुरुवात झाली. पण, अर्थव्यवस्थेला लागलेले ग्रहन संपण्याचे नाव घेत नाहीये.

जानेवारी-मार्चदरम्यान लॉकडाऊन उठवण्यात आला होता. तरीही चौथ्या वित्तीय वर्षात केवळ १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत आलबेल नसल्याचं दिसतंय. पहिल्या तिमाहीत भारतीय जीडीपीमध्ये 24.38 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती. कोरोना महामारीचा हा परिणाम होता. जीडीपी 135.13 लाख कोटींचा स्तर गाठण्याची शक्यता आहे. तो 145.69 लाख कोटींचा स्तर गाठेल, असा अंदाज लावण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com