INX Media : चिदंबरम यांच्या कोठडीत 24 ऑक्‍टोबरपर्यंत वाढ

पीटीआय
Thursday, 17 October 2019

आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने गुरुवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कोठडीत 24 ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली आहे. 

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्ली न्यायालयाने गुरुवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कोठडीत 24 ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली आहे. 

विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) त्यांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. तसेच "ईडीच्या' कोठडीत चिदंबरम यांना घरी शिजवलेले अन्न, पाश्‍चात्य पद्धतीचे शौचालय आणि औषधे घेण्यास परवानगी दिली आहे. "ईडी'ने दिल्लीच्या विशेष न्यायालयाकडे चिदंबरम यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने चिदंबरम यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करत त्यांची कोठडी 24 ऑक्‍टोबरपर्यंत वाढवली.

चिदंबरम पाच सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. चिदंबरम यांनी 2007 मध्ये आयएनएक्‍स मीडियाला 305 कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली होती. त्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: P Chidambaram Now In Enforcement Directorate Custody Leaves Tihar Jail