Padma award 2024 : तारीख ठरली ! आचारसंहितेच्या काळात होणार पद्म पुरस्कार वाटपाचा समारोह, काय सांगतो नियम

पद्म पुरस्कार २०२४ ची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली होती आणि त्यानंतर २२ एप्रिलला राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. लोकसभा निवडणूकांमुळे देशभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
Padma award 2024
Padma award 2024sakal

Padma award 2024 : पद्म पुरस्कार २०२४ ची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली होती आणि त्यानंतर २२ एप्रिलला राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. लोकसभा निवडणूकांमुळे देशभर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला पद्म पुरस्कारांबाबत माहिती देण्यात आली आहे.

निवडणूकांच्या कालावधीत पार पडणाऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री दिवसभर व्यस्त असणार आहेत. तसेच आदर्श आचार संहितेबद्दल बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, "पुरस्कार अगोदरच घोषित केले आहेत, त्यामुळे कोणत्याचं आचार संहितेच्या नियमाचे उल्लंघन होत नाही." पुरस्कार विजेत्यांना २२ एप्रिलला होणाऱ्या या कार्यक्रमाची सूचना देण्यात येत आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी नुकतीच भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, कृषी वैज्ञानिक एम. एस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे.

२०२३ ला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी दोन टप्प्यांमध्ये पद्म पुरस्कार दिले होते. २३ मार्च आणि ५ एप्रिलला पद्म पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला होता. यावेळी निवडणूकांमुळे पुरस्कार वितरणाला खुप उशीर झाला आहे. यावेळी पुरस्कार विजेत्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील १३२ व्यक्तींचा समावेश आहे.

Padma award 2024
Padma Bhushan theft: अजब चोरीची गजब गोष्ट; 'पद्मभूषण' चोरला, विकायला नेला, पण सोनाराच्या हुशारीमुळे....

२०२४ मध्ये ५ पद्म विभूषण, १७ पद्म भूषण आणि ११० पद्मश्री पुरस्कार दिले जाणार आहेत. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सामाजिक कार्यकर्त्ये बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर), अभिनेत्री वैजयंती माला, नृत्यांगणा पदमा सुब्रमण्यम आणि अभिनेत्री कोनिडेला चिरंजीवी यांना पद्म विभूषण पूरस्काराने सन्मानित केले जणार आहे.

पद्म पुरस्कार हे सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रीकी, व्यापार, उद्योग आणि साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिले जातात. पद्म पुरस्कार हे भारतरत्न नंतरचे सर्वोच्च नागरी सन्मान आहेत. पद्मविभूषण पुरस्कार हा असामान्य आणि विशेष कार्यासाठी दिला जातो. पद्मभूषण पुरस्कार हा उच्च स्तरीय विशेष कार्यासाठी कार्यासाठी दिला जातो आणि पद्मश्री पुरस्कार हा विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिंना दिला जातो.

Padma award 2024
Padma Awards 2024 : कोण आहे ‘हाथी की परी’? भारतातील पहिल्या महिला माहुतला मिळाला पद्मश्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com