सरकारकडून २०२२चे पद्म पुरस्कार जाहीर; वाचा सविस्तर यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर

असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर

२०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावर्षी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. पद्मविभूषण पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.

पद्मश्रीमध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा सन्मान होणार आहे

  • डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर)

  • हिंमतराव बाविस्कर

  • सुलोचना चव्हाण

  • डॉ. विजयकुमार डोंगरे

  • सोनू निगम

  • अनिलकुमार राजवंशी

  • भीमसेन सिंघल

पद्मविभूषण

१. प्रभा अत्रे (कला)

२. राधेश्याम खेमका (साहित्य - मरणोत्तर)

३. जनरल बिपीन रावत (सिव्हील सर्व्हीसेस - मरणोत्तर)

४. कल्याण सिंग (पब्लिक अफेअर्स - मरोणत्तर)

पद्मभूषण

१. गुलाम नबी आझाद

२. व्हीक्टर बॅनर्जी

३. गुरमित बावा (मरणोत्तर)

४. बुद्धदेव भट्टाचार्य

५. नटराजन चंद्रशेखरन

६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला

७. मधुर जेफरी

८. देवेंद्र झांजरीया

९. राशीद खान

१०. राजीव मेहेरश्री

११. सुंदरंजन पिचाई

१२. सायरस पुनावाला

१३. संजया राजाराम (मरणोत्तर)

१४. प्रतिभा रे

१५. स्वामी सच्चिदानंद

१६. वशिष्ठ त्रिपाठी

2022 सालातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातून प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, संरक्षण क्षेत्रामधून बिपिन रावत, कल्याण सिंग यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यांच्यासोबतच सोनू निगम, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Web Title: Padma Awards 2022 Have Been Announced Bipin Rawat Balaji Tambe Satya Nadela

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Padma awards