Padma Awards 2023 : सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण यादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

padma-awards

Padma Awards 2023 : सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या संपूर्ण यादी

नवी दिल्ली : ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म नागरी पुरस्कारांची करण्यात आली आहे. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये एकूण १०६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांपैकी ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण तर ९१ पद्मश्री जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकाचा समावेश आहे. (Padma Awards 2023 announcement of Padma Awards by Central Govt Know complete list of awardee)

झाडीपट्टी रंगभूमी कलाकार परशुराम खुने यांना पद्मश्री

महाराष्ट्रातून गडचिरोलीच्या झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम कोमाजी खुने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भात लावणीच्या हंगामात सादर केले जाते. त्यांनी पाच हजाराहून अधिक नाटकांमध्ये जवळपास 800 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. परशुराम कोमाजी खुने यांचे नक्षलग्रस्त भागातील दिशाभूल झालेल्या तरुणांचे पुनर्वसन करण्यातही मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

ORS च्या शोधाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण

यंदा जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारामध्ये पश्चिम बंगालचे माजी डॉ. दिलीप महालानबीस यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात येणार आहे. ओआरएसच्या शोधाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे.

पाहा पद्म पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी...

-पद्म विभूषण-

 1. डॉ. दिलीप महलानाबीस (मरणोत्तर)

 2. झाकीर हुसेन (कला)

 3. एस. एम. कृष्णा (पब्लिक अफेअर्स)

 4. बाळकृष्ण दोषी (मरणोत्तर)

 5. श्रीनिवास वर्धन

 6. मुलायमसिंह यादव

-पद्मभूषण-

 1. एस.एल. भैरप्पा

 2. कुमार मंगलम बिर्ला

 3. दीपक धार

 4. वाणी जयराम

 5. स्वामी चिन्ना जियर

 6. सुमन कल्याणपूर

 7. कपिल कपूर

 8. सुधा मूर्ती

 9. कमलेश दी. पटेल

-पद्मश्री-