
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (५ एप्रिल) पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे बुधवारी एका विशेष कार्यक्रमात पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये बिहारचे आनंद कुमार यांना राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कार प्रदान केला. ते सुपर ३० संस्थेचे संचालक आहेत. त्यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखणीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
राष्ट्रपती भनव येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. २०२३ मध्ये मुलायम सिंह यादव यांच्या सोबतच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा, मणिपुरचे भाजप अध्यक्ष थौनाओजम चौबा सिंह आणि त्रिपुराचे दिवंगत नेते नरेंद्र चंद्र देबबर्मा यांना देखील पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
या वर्षी तब्बल १०६ लोकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. ज्यामध्ये ६ पद्म विभूषण, ९ पद्म भूषण आणि ९१ पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बिहारमधील पटना इथं सुपर 30 ही शैक्षणिक संस्था आनंद कुमार चालवत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून आनंद कुमार मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिकण्याची आणि राहण्याची सुविधा देतात.
फक्त भारतातच नाही तर जगभरात त्यांनी नाव कमावले आहे. आनंद कुमार यांनी अमेरिकेनं द एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड 2019 ने सन्मानित केलं आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारीत सुपर थर्टी नावाचा चित्रपटही आला आहे.
दिवंगत समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. त्यांचा मुलगा आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तसेच आचार्य डॉ. सुकामा देवी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय प्रेमजीत बारिया, हेमंत चौहान, डॉ.राधाचरण गुप्ता यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. नाटू-नाटू गाण्याचे संगीतकार एम.एम. कीरावानी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.