सुरेश वाडकरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

Padma shri award declared to singer suresh wadkar
Padma shri award declared to singer suresh wadkar

पुणे : आपल्या सुरेल आवाजांनी मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गायक सुरशे वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. ए जिंदगी, मेघा रे मेघा रे यांसारख्या गाण्यांपासून चप्पा चप्पा चरखा चले आणि सपने मे मिलती है अशी गाणी सुरेश वाडकर यांनी सुरेश वाडकर यांच्या आवाजाने अजरामर झाली. 

सुरेश वाडकर यांच्या अनेक मधुर गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप सो़डली आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुरेश वाडकर यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ''या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय माझ्या गुरूंना आणि संगीतकारांना आहे. माझ्या गुरूंनी माझ्या बहिणीने जर, मला ओळखलं नसतं तर, कदाचित मी घडलो नसतो आणि माझ्या संगीतकारांशिवाय मी इथवर पोहोचलो नसतो.''

भारत सरकारच्या मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार सुरेश यांना जाहीर झाल्यावर त्यांनी सर्व श्रेय हे गुरुंना आणि कुटुंबाला दिले आहे. आजवर सुरेश यांना गायनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर्वच स्थारातून सुरेस वाडकर यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

सुरेश वाडकर यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कोकणी गाणीही गायली आहेत. 2007 मध्ये महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र भूषण' या पुरस्काराने गौरवलं होतं. 'मी सिंधूताई सपकाळ' या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. मध्य प्रदेश सरकारने ‘लता मंगेशकर पुरस्कार' यानेही सुरेश यांना गौरवलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com