पद्मश्री विजेत्याने पंतप्रधान मोदींना भेट दिली जामदानी 'साडी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद्मश्री विजेत्याने पंतप्रधान मोदींना भेट दिली जामदानी 'साडी'
पद्मश्री विजेत्याने पंतप्रधान मोदींना भेट दिली जामदानी 'साडी'

पद्मश्री विजेत्याने पंतप्रधान मोदींना भेट दिली जामदानी 'साडी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालचे विणकर आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बिरेन कुमार बसाक यांचे ट्विट करून आभार मानले. मोदींना त्यांनी साडी भेट दिली होती. “मोदीजी आम्हाला पाठिंबा देतात. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. हे संपूर्ण जामदानी विणकर समुदायासाठी ‘अच्छे दिन’ चे प्रतीक आहे,” असे पद्म पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विणकाम केलेली साडी भेट देणाऱ्या प्रख्यात जामदानी विणकर बिरेन कुमार बसाक यांनी सांगितलं. ही भेट स्वीकारल्यानंतर या भेटवस्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींनी एक ट्विट केले. राष्ट्राला संबोधित करताना त्यांनी ही साडीही दाखवली.

बिरेन कुमार बसाक हे पश्चिम बंगालमधील नादियाचे आहेत. ते एक प्रतिष्ठित विणकर आहे, जे आपल्या साड्यांमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे विविध पैलू चित्रित करतात. पद्म पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधत असताना त्यांनी माझ्यासमोर असे काहीतरी सादर केले, जे मला खूप आवडलं”, असे ट्विट त्यांनी केले.

अवघ्या १ रुपयांपासून प्रवास सुरू करणाऱ्या बसाक यांच्याकडे आता ५००० विणकर काम करत आहेत. फाळणीनंतर बांगलादेशातून भारतात स्थलांतरित झालेल्या ७० वर्षीय पद्मश्री पुरस्कार विजेते बसाक म्हणाले की, “ही मान्यता केवळ माझ्यासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी आहे. आपली ‘रॅग्स टू रिच स्टोरी’ शेअर करताना बसाक म्हणाले की, त्यांनी १९७० च्या दशकात आपला प्रवास सुरू केला आणि कोलकात्यात आपल्या भावासोबत घरोघरी साड्या विकल्या. “या भेटवस्तूची कल्पना माझी असली तरी ती दुसऱ्या विणकराने अमलात आणली. ही साडी बनवायला चार महिने लागले. २०११-१२ पासून पंतप्रधानांना भेट देण्याची इच्छा होती”, अशी भावना बसाक यांनी व्यक्त केली.

बसाक यांना त्यांच्या कौशल्य आणि उत्कृष्ट कारागिरीसाठी यापूर्वी २०१३ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हातमागावर विणलेल्या साडीवर रामायणाचे चित्रण केल्याबद्दल यूके-स्थित वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीकडून त्यांना मानद डॉक्टरेट देखील मिळाली, त्या साडीला सर्वात लांब विणलेली साडी म्हणून गिनीज बुकने देखील मान्यता दिली होती.

पारंपारिक विणकामाच्या भवितव्याबद्दल त्यांचा मुलगा अभिनबा बसाक म्हणाला की, “विणकाम कला आणि ते करणारा समुदाय दोन्ही खूप चांगले काम करत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रशिक्षित करण्याचा विचार आहे. आमच्या कुटुंबात चार पिढ्यांहून अधिक काळ अस्तित्वात असलेली कलाकृती भविष्यातील पिढ्यांनी स्वीकारण्याची इच्छा नसण्याचा प्रश्नच नाही,” असं तो म्हणाला.

loading image
go to top