smart meter electricity bill
sakal
उत्तर प्रदेशातील लाखो वीज ग्राहकांसाठी जुलै महिना दिलासादायक ठरणार आहे. उत्तर प्रदेश विद्युत नियामक आयोगाच्या महत्त्वाच्या निर्णयानुसार, नवीन वीज जोडणी घेताना स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांकडून आकारण्यात आलेली अतिरिक्त रक्कम आता परत केली जाणार आहे. ही रक्कम थेट ग्राहकांच्या मासिक वीज बिलातून वजा केली जाईल.
याशिवाय, इंधन आणि वीज खरेदी खर्चातील बचतीमुळे राज्यातील सर्व वीज ग्राहकांच्या बिलात ४.४३ टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एकूण ३५८.३१ कोटी रुपयांचा दिलासा मिळणार आहे.