हिंदू मुलीला लग्नासाठी जबरदस्तीने बनवले मुस्लिम

वृत्तसंस्था
Friday, 30 August 2019

पाकिस्तानमध्ये शीख मुलीला जबरदस्तीने मुस्लिम बनवून तिचा मुस्लिम युवकासोबत लग्न लावण्यात आले आहे.

अमृतसह (पंजाब): पाकिस्तानमध्ये शीख मुलीला जबरदस्तीने मुस्लिम बनवून तिचा मुस्लिम युवकासोबत लग्न लावण्यात आले आहे, अशी तक्रार मुलीच्या वडीलांनी केली आहे. या घटनेमुळे शीख समुदायामध्ये खळबळ उडाली आहे.

एका कार्यक्रमासाठी मुलीचे वडील भगवान सिंग हे भारतात आले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'माझ्या मुलीला जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आले. मुस्लिम बनवल्यानंतर तिचा मोहम्महद एहसान या मुस्लिम युवकाशी लग्न लावण्यात आले. पाकिस्तानमध्ये हिंदू व शीख धर्मामधील मुलींचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने मुस्लिम बनवले जात आहे.'

शीख मुलीला मुस्लिम बनवल्यानंतर तिचे लग्न लावण्यात आले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी याविरोधात तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

मुलीचा भाऊ मनमोहन सिंग म्हणाला, 'माझ्या बहिणीचे वय 16 ते 17 दरम्यान आहे. 27 ऑगस्ट रोजी तिचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर तिला जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात आले असून, मुस्लिम युवकाशी लग्न लावण्यात आले आहे. मोहम्मद व त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pak Sikhs daughter forcibly converted, married to Muslim